आपला जिल्हाताज्या घडामोडी

जालना शहरातील झोपडपट्यांना जो पर्यंत मालकी हक्क प्राप्त होत नाही, पी. आर. कार्ड उपलब्ध करून देत नाही तो पर्यंत  जलना नगर पालिकेचा महानगर पालीकेत रूपांतर करण्यास विरोध, काँग्रेस सेवा दलच्या आंदोलनचा इशारा.

Spread the love

जालना शहराचा नगर पालीकेला महानगर पालिकेत रूपांतर विरोधात तथा शहरातिल झोपडपट्टयांना मालकी हक्क प्रदान करावे या मागणि साठी   ज़िल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांना काँग्रेस सेवा दलच्या वतीने  निवेदन देण्यात आले आहे.


 जालना शहराचे नगर पालिकेला महानगर पालीकेत रूपांतर करण्यास शासनाने अधिसुचना जारी केले आहे. याविषयी आम्ही जालना शहराचा महानगर पालीकेत रूपांतर करण्यास पुर्णपणे विरोध करीत आहे. हा एक तर्फी निर्णय बालकणीत बसुन घेतलेला निर्णय आहे. गोगरीबांचे उद्योगावर मारलेला हतोडा आहे. महानगर पालीका होण्यापुर्वीच जालना नगर पालीकने ९५% टक्के जालना शहराचा विकास केला आहे. पाणी, स्वच्छता, रस्त, स्ट्रीट लाईट व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून जालना शहराचा मोठा विकास मा. नगर अध्यक्षता संगीता ताई गोरंट्याल यांच्या नेतृत्वात विकास करण्यात आला आहे.

जालना शहरात ३०/३५ वर्षांपासून बसलेल्या झोपडपट्टया आज पर्यंत मालकी हक्कापासून वंचित आहे. ही बाब लक्षात घेता जालना शहरातील झोपडपट्यांना जो पर्यंत मालकी हक्क प्राप्त होत नाही, पी. आर. कार्ड उपलब्ध करून देत नाही तो पर्यंत आम्ही जालना नगर पालिकेचा महानगर पालीकेत रूपांतर विरोध करीता आहे.

 शहरातील मोठया झोपडपट्टी वस्त्या, कन्हैयानगर, संजयनगर, नुतन वसाहत, रामनगर, गांधीनगर, इंदिरानगर, व इतर झोपडपटीवासियांच्या घरांना संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. महानगर पालिकेत रूपांतर झाल्या नंतर या झोपडपट्यांना उठविण्याचा किंवा बुलडोजर चालवून झोपडपट्यांचा जागा मोठया बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा डाव शासना होत असेल, या मध्ये स्थानिक नेत्यांचा यापुर्वीही झोपडपटयावर बुल्डोजर चालविण्याचा प्रयत्न होता.

जालना शहर नगर पालिकेला महानगर पालिकेत रूपांतर करण्याचा हा डाव  टॅक्स वसुली व गोरगरीबांच्या घरावर व धंदयावर हतोडा मारण्याचा आहे. जेणे करून या विरूध्द आम्ही या निवेदनाद्वारा विनंती करतो की, शासनाने त्वरीत जालना शहर नगर पालिकेला महानगर पालिकेत रूपांतर करण्याचा निर्णय रद्य करून,किंवा स्थगीती दयावी असे निवेदन देण्यात आले आहे.

अन्यथा आम्ही कॉंग्रेस सेवादल, तसेच सामाजिक संघटना व शहरातील मुख्य सामाजिक कार्यकर्ता सोबत १९/५/२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर निषेध आंदोलन केले जाईल.असा ईशारा दिला आहे,

निवेदनावर संगीता कांबळे – शहराध्यक्षा, कांग्रेस सेवादल, जालना,सय्यद मुंन्शी – तालुका अध्यक्ष, कांग्रेस सेवादल, जालना,अब्दुल रफीक – जिल्हा कार्यध्यक्ष कांग्रेस सेवादल, जालना,किशोर गायकवाड,शेख सलमान,शेख मुन्ना,कैलाश क्षीरसागर ,शोएब खान,गणेश गिराम,गणेशकाकासाहेब दानवे ,विष्णु कडूबा भालेराव ,मोहम्मद सलीम यांच्या सह्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!