आपला जिल्हाताज्या घडामोडी

JALNA जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत; राज्याच्या उपसचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जालना नगरपालिकेचे महानगर पालिकेत रुपांतर झाल्यानंतर नेमके काय बदल होणार ? राजकारणात आणि सामान्य नागरीकांवर काय परीणाम होतील लवकरंच सविस्तर बातमी प्रकाशीत केली जाईल

Spread the love

महापालिकेचा मुद्दा मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा चर्चेत आला , जो तो आपल्या परीने याची खात्री करण्यासाठी माध्यमांसह अन्य मित्रांकडे विचारणा करतांना दिसून येत होता . परंतु कोणीच यावर ठामपणे भाष्य करत नसल्याने पंचाईत झाली होती.


असे असले तरी महापालिका व्हावी ही माजी मंत्री अर्जुन खोतकरांची दिड वर्षापासूनची मागणी होती , तर महापालिकेच्या आडून जनतेतून होणारी नगराध्यक्षपद टाळणे हेच विरोधकांचे एकमेव लक्ष्य असल्याचे सांगत महापालिका झाली तरी पब्लिक सब जानती है … त्यामुळे तेथेही झेंडा आमचाच फडकेल असा विश्वास आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला .

हरकती आणि सूचना मागविणार

जालना पालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून प्रथम अधिसूचना जारी करण्यात आली . ही अधिसूचना जारी झाल्यानंतर यावर नागरीक , व्यापारी , उद्योजकांच्या सुचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत . या सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर त्या सर्व हरकती आणि मुद्दे हे नगरविकास विभागाकडे पाठविले जातील आणि नंतर खऱ्या अर्थाने महापालिका अस्तित्वात येऊ शकते .

२०१६ प्रमाणेच याहीवेळी नगराध्यक्षांची निवडणूक ही जनतेतून करण्याची घोषणा सरकारने केली आहे . त्यामुळे जालन्यातील वातावरण ढवळून निघाले आहे . ही जागा आता कुठल्या प्रवर्गासाठी सुटते यावरच अनेकांचे भविष्य अवलंबून आहे . परंतु प्रवर्ग कुठलाही सुटला तरी आम्ही थेट जनतेची कामे केली आहेत , हे वास्तव आहे . त्यामुळे विरोधकांच्या म्हणजेच भाजप आणि शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे . त्यामुळे जर जालना पालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याचा घाट माजी मंत्र्यांकडून केला जात आहे , परंतु त्यांनी कितीही राजकारण केले तरी आम्ही जनतेच्या मनात असल्याने निवडणुकीत आम्हीच बाजी मारू हा विश्वास आपल्याला असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नमूद केले .

दुसरीकडे जालना पालिकेचे रूपांतर म हापालिकेत केल्यास पालिकेतील विस्कटलेली प्रशासकीय घडी बसण्यास मोठी मदत होणार असून , स्वतंत्र आयएस दर्जाचा अधिकारी आयुक्त म्हणून तेथे पूर्णवेळ राहणार आहे . आज ज्या प्रमाणे काही बाहुबली नगरसेवकांच्या हातात कारभार असून त्याला चाप लागेल आणि अनेकांची आर्थिक रसद बंद होणार असल्याने त्यांचा महा पालिकेस थेट विरोध असल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नमूद केले .

मुंबईत झालेक्या एका महत्वाच्या बैठकीत महापालिकेबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले . त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा जालना महापालिकेच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी होईल असे सूत्रांनी सांगितले . परंतु याला कोणीच ठोस दुजोरा दिला नव्हता परंतु आता राज्याच्या उपसचिवांनी जिल्हाधिकार्यांना निर्देश देत पत्र पाठवले आहे .

दरम्यान दिड वर्षांपूर्वी आजचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना दौऱ्यावर आले असतांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आपण जालना महापालिका व्हावी असा प्रस्ताव मांडल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नमूद केले . त्यामुळे आपण निवडणुका डोळ्या समोर ठेवून महापालिकेचा मुद्दा रेटत नसल्याचे खोतकरांनी आवर्जुन सांगितले .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!