आपला जिल्हाताज्या घडामोडी
जालना वक्फ़ कार्यालयाला संतप्त जालनेकरांनी ठ़ोकले टाळे । ऐतिहासिक मुर्तीबेस अनधिकृत रित्या जमींनदोस्त करणा-या नगरपालिका अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा ! संतप्त नारीकांचा पवित्रा

जालना शहरातील ऐतिहासिक मुर्तीबेस ला कोणतीही परवाणगी नसतांना अनधाकृतरित्या 7 मे रोजी दिवस निघण्याअगोदर अंधारात नगरपालिकेच्या अधिकार्यांनी जमीनदोस्त केले.
विशेष बाब म्हणजे ऐतिहासिक मुर्ती बेस ला ज्या दिवशी तडा गेला होता त्याच दिवशी नगरपालिकेने सिल करुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते काद्राबाद कडे जाणारा मुख्य रस्ताच बंद केला होता आणि हा रस्ता सलग अठरा ते विस महीने बंद असल्याने जालनेकरांची चांगलीच दैना झाली होती , ऐतिहासिक मुर्तीबेस संपवण्याचा कट रचत काहीना काही बहाना करुन टाळाटाळ केली ,
त्यानंतर जालना नगरपालिकेने दुरुस्तीसाठी निविदा काढुन ऐतिहासिक मुर्तीबेस दुरुस्तीचे कामसुद्धा सुरु केले होते आणि अचानक विभागिय आयुक्त यांनी त्या ऐतिहासिक मुर्तीबेस दूरुस्ती च्या घटनास्थळी भेट दिली आणि दुरुस्तिचे काम थांबवण्याच्या सुचना दिल्या आता जालना नगरपालिकेला अजुन एक बहाना ,संधी मिळाली याचा फायदा घेत ऐतिहासिक मुर्तीबेस ला जमीनीपासुन वर चारफुट ठेऊन बाकीचा भाग ऊतरवण्यात आला या नंतर तो ऐतिहासिक वारसा पुन्हा दुरुस्त केला जाईल अशी शाश्वती वारंवार प्रशासनाकडुन देण्यात आली
जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची ऐतिहासिक मुर्तीबेस ला काहीही कट कार्यस्थान करुन पुर्ण जमिनदोस्त करण्याची मानसिकता शेवटी पहावयास मिळाली
रविवारी सकाळी चार वाजता अंधारातंच नगरपालिका मुख्याधिकारी आपल्या कर्मचार्यांसहीत पोलिस प्रशासनाच्या सुरक्षेत ऐतिहासिक वारसा मुर्तीबेस ईथे पोहोचले आणि कडक बंदोबस्त लाऊन अधिकाराचा गैर वापर करीत अंदाजे तिन साडेतीन शे वर्षापुर्वीचा वारसा जमिनदोस्त केला.
या वेळी जालना वक्फ़ अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा तेथे हजर होते मात्र त्यांनी फक्त़ बघ्याची भुमिका घेतली होती याचाच राग जालनेकरांनी आज व्यक्त केला