संपादकीय

मान्यता नसलेल्या बोगस नारायणा ई टेक्नो शाळेच्या खोटारडे पणाची पोलखोल। ईरादा पत्राला मान्यता म्हणुन पालकांना करताहेत भ्रमीत। 21एप्रील 2023 रोजी प्राप्त केला ईरादा पत्र ,ईरादा पत्राआधारे शाळा वर्ग सुरु करता येऊच शकत नाही, 424 विद्यार्थ्यांची,पालकांची आणि शिक्षण विभागाची केली फ़सवणुक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ साहेब कुंभकर्णी झोपेतुन ऊठा आणि नारायणा ई टेक्नो शाळेच्या मुख्याध्यपकांवर गुन्हा दाखल करा।

Spread the love

दै सत्यवार्ता विशेष : जालना शहरातील नारायणा ई टेक्नो शाळा बोगस असल्याच्या बातम्या दै सत्यवार्ता समाचार ने वेळोवेळी छापल्या आणि फक्त़ बातम्याच छापल्या नसुन शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी,केंद्र प्रमुख,विस्तार अधिकारी या सर्वांकडे या बाबतीत पाठपुरावा सुद्धा केला.


शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ नारायणा ई टेक्नो स्कुल वर कारवाई करण्याएवजी अभय देण्यात धन्यता मानत असल्याचे निदर्शनास आले कारण वारंवार तक्रार केल्यानंतर शेवटी पाठपुराव्याला कंटाळुन कोणताही बोभाटा न करता नारायणा ई टेक्नो शाळेला 12 एप्रील रोजी सिल ठोकले .

परंतु दुसर्याच दिवशी नारायण इ टेक्नो स्कुल नेहमी प्रमाणे अनधिकृत रित्या सुरुच होती आणि दररोज विद्यार्थी शाळेत हजेरी लावत होते याची तक्रार लेखी व प्रत्यक्ष शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांना दै सत्यवार्ता समाचार ने दिली आणि बोगस नारायणा ई टेक्नो शाळेने पालकांची फ़सवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करा असे आवाहन केले

परंतु शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ मात्र कोणताही प्रतिसाद देत नव्हते या ऊलट बोगस नारायणा ई टेक्नो शाळेवर कार्रवाई करण्या एवजी कर्त्व्यात कसुर करुन बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या नारायणा ई टेक्नो शाळेला अभय देत असल्याचे निदर्शनास आले,कारण सिल करण्याची कारवाई फक्त़ कागदावरंच केली होती प्रत्यक्षात शाळा मात्र सुरुच आहे.

नाईलाजास्तव शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हापरीषद मुख्याधिकारी, शिक्षण उपसंचालक औरंगाबाद, शिक्षण आयुक्त़,आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे,

जाणुन घ्या ईरादा पत्र म्हणजे काय?

नारायणा ई टेक्नो शाळेने ईरादा पत्रासाठी अर्ज केल्यानंतर आता 21एप्रील रोजी राज्य शासना तर्फे ईरादा पत्र देण्यात आला आहे ,ईरादा पत्र म्हणजे शाळा सुरु करायचा ईरादा (मान्यता तर मुळीच नाही) या नंतर अनेक अटी शर्तींची पुर्तता करावी लागते शाळा खोल्या ,खेळाचे खूले मैदान ,विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन,शौचालय,प्रयोगशाळा ,प्राचार्य,शिक्षक वर्ग हे सर्व ईरादापत्र प्राप्त झाल्यानंतर करावे लागते आणि हे सर्व व्यवस्थित असल्यास राज्य सरकारतर्फे मान्यता मिळेल की नाही हे ही सांगता येत नाही कारण थोडी जरी चूक असली तर मान्यात फेटाळली जाण्याची शक्यता असते त्या नंतर मान्यता,युडाईसनम्बर,परवाणगी अशा अनेक बाबींची पुर्तता केल्यानंतरच विद्यार्थ्यांचे प्रवेश करता येते,

परंतु मागील एक वर्षापासुन नारायणा ई टेक्नो स्कुल अनधिकृतपणे सुरु होती शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी अनेक वेळा पंचनामा ही केला त्या पंचनाम्यात 424 विद्यार्थ्यांची संख्या ही नोंद करण्यात आली

आता शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी नारायणा ई टेक्नो शाळेच्या मुख्याध्यपक,उपमुख्याध्यापकांवर कोणतीही मान्यता नसतांना 424 विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ तर केलाच शिवाय पालकांची आणि शिक्षण विभागची फ़सवणुक केल्या प्रकरणी त्वरीत गुन्हे दाखर करावे लागतील आणि 424 विद्यार्थ्याचे दुसर्या शाळेत समायोजन (प्रवेश) करावे लागेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!