जालनकरांनो तुमची मुलं नारायणा ई टेक्नो या बोगस शाळेत तर शिकत नाही ना..? राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट, राज्यात तब्बल ६९० अनधिकृत शाळा आढळल्या असून यापैकी २०० शाळा शासनाने बंद केल्या
अनाधिकृत शाळांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. शिक्षण विभागाची परवानगी न घेता शाळा सुरू करणे, नियम आणि अटींची पूर्तता न करताच एडमिशन करणे, दुसऱ्या शाळांच्या यूआयडी क्रमांकावर विद्यार्थ्यांची एडमिशन असेल, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम भासवून केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवणे. असे अनेक प्रकार सर्रासपणे अनेक शहरात सुरू असल्याने यात विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक तर होतेच आहे, शिवाय विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतही खेळ सुरू असल्याचे दिसत आहे.
राज्यात तब्बल ६९० अनधिकृत शाळा आढळल्या असून यापैकी २०० शाळा शासनाने बंद केल्या असून तुमची मुलं अनधिकृत शाळेत तर शिकत नाहीये ना, हे तपासून पाहण्याची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचं बाजारीकरण झाल्याची ओरड सातत्यानं होतेय.
शाळांची मनमानी, फी वाढ याची अनेक उदाहरणे समोर आलीयत. मात्र आता चक्क अनेक शाळाचं अनाधिकृत आणि बोगस असल्याचं आढळून आल्याने ज्ञान दानाचं काम करणाऱ्या शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसलाय.
जालना – नारायणा ई टेक्नो स्कुल अनधिकृत असल्यामुळे शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी बंद केली आहे,परंतु सिल केल्यानंतर ही मात्र नारायणा ई टेक्नो स्कुल सुरुच असल्याने मुख्याध्यापक व संबंधितांवर लवकरंच गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहीती शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी सत्यवार्ता समाचार ला दिली
मात्र नारायणा ई टेक्नो स्कुल ला सील केल्यानंतरही अनधिकृत पणे सुरुच असल्याचे पुरावे आम्ही सरळ शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांना दिले त्याच वेळी नारायणा ई टेक्नो स्कुल च्या मुख्याध्यापक,ऊपमुख्याध्यापका सहीत संचालकांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे असतांना ही शिक्षणाधिकारी जाणुन बुजुन मान्यता नसलेल्या नारायणा ई टेक्नो शाळेला अभय देत असल्याने आता पर्यंत गुन्हे दाखल केले नाही.
या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी,जिल्हापरीषद मुख्याधिकारी,शिक्षण ऊपसंचालक,शिक्षण आयुक्त़ सहीत शालेय शिक्षणमंत्री यांना केली आहे,शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ मान्यता नसलेल्या नारायणा ई टेक्नो शाळेला अभय देऊन कर्तव्यात कसुर करत आहे परंतु आता शिक्षणाधिकारी यांची या बाबत तर चौकशी होणारंच आणि नारायणा ई टेक्नो शाळेच्या संबंधितांवर गुन्हे दाखल होतील
जालना शहरात कीती बोगस शाळा सध्या सूरु आहेत अणि कीती बंद केल्या याचीही माहिती सध्यातरी शिक्षणाधिकारी यांनी सत्यवार्ता समाचार ला दिली नाही
शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांना तर नारायणा ई टेक्नो शाळेच्या मुख्याध्यपकांवर गुन्हा दाखल करायला आम्ही कायद्याच्या चौकटीत राहुन भाग तर पाडणारंच परंतु शासनाची मान्यता नसतांना फ़सवणुक केल्याप्रकरणी अनेक पालक सुद्धा पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे दै सत्यवार्ता समाचार ला सांगीतले.
अनधिकृत शाळा आणि बंद केलेल्या शाळांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
छत्रपती संभाजीनगर – अनधिकृत शाळा – ०६ , बंद केलेल्या शाळा – ०६
मुंबई -अनधिकृत शाळा – ५१७, बंद केलेल्या शाळा – ८८
पुणे – अनधिकृत शाळा -६९, बंद केलेल्या शाळा – ३२
लातूर -अनधिकृत शाळा – ०१, बंद केलेल्या शाळा – ००
कोल्हापूर -अनधिकृत शाळा – २८ , बंद केलेल्या शाळा – २७
नागपूर -अनधिकृत शाळा – ४०, बंद केलेल्या शाळा – ३५
अमरावती – अनधिकृत शाळा – ०२ , बंद केलेल्या शाळा -०२